अमित रमेश गोडभरले व सौ. स्नेहा अमित गोडभरले

दिनांक २०.१२.२०१८.
जाहीर प्रगटन
तर्फे
अँड. संदीप एस. औसेकर.
“समृद्धी” वाल्मिक नगर, बार्शी रोड,
लातूर. ९८२२५३८४०८.

माझे पक्षकार १] अमित रमेश गोडभरले व २] सौ. स्नेहा अमित गोडभरले रा. रामवाडी (खरोला) ता. रेणापूर जि. लातूर, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की,
स्थावर मिळकत प्लॉट
विद्यमान मालक अनिल गणपतराव भातलवंडे.
मौजे लातूर (ग्रा) जमीन सर्व्हे क्र. २६६/१ पैकीचा खुला प्लॉट क्र. २६, लातूर महानगरपालिका हद्दी बाहेरील ज्याची लांबी द. उ. ५० फुट व रुंदी पु. प. ४० फुट एकूण २००० चौ फुट सदर प्लॉट चा आउट मंजूर आहे व त्याचा क्र. LATUR/D/522 दिनांक ०९.०९.१९८३ असा आहे तसेच मिळकतीचा एन. ए. मंजूर आहे व त्याचा क्र. 1983/RB/DESK/III/JMB/RR/1585 दिनांक १२.०१.१९८४ असा आहे.
याची चतुसिमा
पूर्वेस : प्लॉट क्र. २७.
पश्चिमेस : प्लॉट क्र. २५.
दक्षिणेस : ९ मी रुंदीचा रस्ता.
उत्तरेस : प्लॉट क्र २१.
वर वर्णनीय चतुसिमेच्या आतील प्लॉट माझे पक्षकार १] अमित रमेश गोडभरले व २] सौ. स्नेहा अमित गोडभरले रा. रामवाडी (खरोला) ता. रेणापूर जि. लातूर, यांनी विद्यमान मालक अनिल गणपतराव भातलवंडे यांचे कडून खरेदी घेण्याचा रीतसर करार केला आहे. सदरील प्लॉट हा पूर्ण निर्विवाद असल्याची हमी व ग्वाही विद्यमान मालकांनी दिली आहे.
तरी सदरील मिळकती बाबत कोणाचा काही कर्ज, बोजा, गहान, उजर, आक्षेप, हरकत, वारसाहक्क, शेजार्याचा वाद, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, इतर काही हितसंबध किवा हक्क संबध, तसेच शासकीय अथवा निमशासकीय हक्क संबध, कर्ज, कर बोजा, किवा इतर कसल्याही स्वरूपाचे हक्क असल्यास त्यांनी सदरील प्रगटन प्रसिद्ध झाल्या पासून ०८ दिवसाच्या आत आपले लेखी उजर माझे खालील पत्या वर आणून सदर करावेत. मुदतीत कोणाचे आक्षेप, उजर नाही आल्यास सदरील खुला प्लॉट हा निर्विवाद आहे असे समजून माझे पक्षकार नोंदणीकृत खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. मुदती नंतर आलेले आक्षेप माझ्या पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
१] अमित रमेश गोडभरले
२] सौ. स्नेहा अमित गोडभरले
रा. रामवाडी (खरोला) ता. रेणापूर जि. लातूर
सत्याई एंटरप्राईजेस चे निवेदन.
सदरील जाहीर प्रगटन हे www.epragatan.com या संकेतस्थळावर प्रगटन देणार यांच्या सुचणे आणि माहिती प्रमाणे संगणकीय प्रणाली द्वारे प्रसिद्ध केले आहे. त्यातील मजकूर देणार यांचे सुचणे प्रमाणे सत्य व बरोबर आहे. सदरील जाहीर प्रगटन हे वर नमूद संकेतस्थळावर कायम स्वरूपी प्रसिद्घ (live) असेल. त्यातील सर्व मजकूर हा संकेतस्थळावर कायम स्वरूपी (स्टोअर) राहणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *