रामनिवास गोविंदलाल भुतडा

दिनांक ०१.०५.२०१९.
जाहीर-प्रगटनचा खुलासा
तर्फे
अँड. मंगेश महिंद्रकर.
लक्ष्मी कॉलोनी, जुना औसा रोड,
लातूर.
मो. क्र. ९८२३०४९२६०.
९८९०४४९२६०.

माझे पक्षकार रामनिवास गोविंदलाल भुतडा, लक्ष्मीनिवास गोविंदलाल भुतडा, ओमप्रकाश गोविंदलाल भुतडा व ललिताबाई ओमप्रकाश भराडिया, यांनी मला माहिती देऊन अधिकृत केल्यावरून व सादर केलेल्या कागदपत्रा वरून दिनांक ३०.०४.२०१९ रोजी दैनिक लोकमत आणि दैनिक पुण्यनगरी मध्ये अँड. डी. एल. घोगरे यांनी त्यांचे पक्षकार गोकुळदास मदनलाल भुतडा, वल्लभदास मदनलाल भुतडा, निर्मला विठ्ठलराव मणियार आणि गीताबाई श्रीनिवासजी दाड यांचे वतीने मौजे अहमदपूर जमीन सर्व्हे क्र. ७० मधील खालील चतुःसीमेतील आतील जमिनीबाबत दिलेल्या जाहीर प्रगटनास खुलासा प्रसिद्ध करण्यात येत आहे.
जमीन चतुःसीमा :
पूर्वेस : डॉ. निलेश मजगे व रामचंद्र सूर्यवंशी यांची जमीन.
पश्चिमेस : सुरेंद्र रेड्डी, विजय रेड्डी व अजित रेड्डी तसेच रामनिवास, लक्ष्मीनिवास, ओमप्रकाश पी. गोविंदलाल भुतडा व ललिताबाई भ्र ओमप्रकाश भराडिया यांनी त्यांची विक्री केलेली जमीन.
दक्षिण : मुश्ताक बक्षी, गणी मिस्तरी यांची प्लॉटीग व तसेच रामनिवास, लक्ष्मीनिवास, ओमप्रकाश पी. गोविंदलाल भुतडा व ललिताबाई भ्र ओमप्रकाश भराडिया यांनी त्यांची विक्री केलेली जमीन
उत्तरेस : दत्तात्रय शंकरराव पंतोजी यांची जमीन. व औसवाडी रस्ता
अँड. डी. एल. घोगरे यांचे पक्षकारांनी वस्तुस्थिती विसंगत जाहीर प्रगटन दिलेले आहे. वस्तुस्थिती अशी की, मा. दिवाणी न्यायालयाने जाहीर प्रगटन देणार यांनी दाखल केलेले वादपत्र दोन वेळा नामंजूर केले बाबत आदेश केलेले आहेत. जाहीर प्रगटन देणार यांनी या पूर्वी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दोन (२) आदेशां पैकी एका आदेशांचे नाराजीने याचिका दाखल केलेली होती तीही मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे नामंजूर झालेली आहे.
आमच्या पक्षकाराने जाहीर प्रगटन देणार यांचा दावा हा कसा गैरलागू, वस्तुस्थिती विसंगत आहे याबाबत मे. दिवाणी न्यायालय अहमदपूर न्यायालयात जवाबदावा दिलेला आहे. आमचे पक्षकाराचे ७/१२ उतार्याला असलेले नाव ते जमिनीचे वास्तविक मालक व कब्जेदार आहेत म्हणून नोंदलेली आहे आणि माझे पक्षकारांचे वडिलांचे नाव १९६० पूर्वी पासून निरंतर नोंदीत आहे तसेच १९९३ पासून माझे पक्षकारांचे नाव ७/१२ उतार्यावर मालकी रकान्यात निरंतर आज पर्यंत नमूद आहे.
मा. दिवाणी न्यायालय अहमदपूर यांनी वादपत्र नामंजुरीचा आदेश अँड. डी. एल. घोगरे यांचे पक्षकारांचे विरुद्ध २ वेळा केलेला आहे. कोणत्याही दाव्याची सुरवात ही वादपत्रानेच होत असते आणि अँड. डी. एल. घोगरे यांचे पक्षकारांचे विरुद्ध आता पर्यंत मा उच्च न्यायालयाचा एक (१) आणि मा. दिवाणी न्यायालय अहमदपूर यांचे दोन (२) आदेश याच मिळकती बाबत झालेले आहेत.
अँड. डी. एल. घोगरे यांचे पक्षकारांनी केवळ याचिका दाखल केल्याने माझे पक्षकारांच्या मिळकतीच्या मालकी, कब्जा, अधिकारावर कसलाही परिणाम होत नाही. जाहीर प्रगटन देणार हे विनाकारण मिळकत वादातील असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सबब हे खुलासा.
खुलासा देणार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *