अँड. एस. व्ही. देशपांडे.

तमाम जनतेस विशेषतः मौजे पाखरसांगवी, ता. जि, लातूर हद्दीतील सर्व जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार क्र. १. प्रकाश दगडू कांबळे, २, रामदास दगडू कांबळे दोघेही रा. लामजना, ता. औसा, जि. लातुर यांनी मला दिलेल्या माहिती व दाखविलेल्या कागदपत्रावरून पुढीलप्रमाणे जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार यांनी मौजे पाखरसांगवी, ता. जि, लातूर येथील खुला प्लॉट जमीन गट क्रं. ६२ पैकीचा ज्याचा एन. ए. क्रं. एल.टी.आर./८७१/८४ दि. ११/१०/१९८४. प्लॉट क्रं. १७, ज्याचे क्षेत्रफळ २००० चौ. फुट. मध्ये दक्षिण-उत्तर लांबी – ५० फुट व पूर्व-पश्चीम रुंदी – ४० फुट तसेच त्यालगत असलेला प्लॉट क्रं. १८ ज्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० चौ. फुट मध्ये दक्षिण-उत्तर लांबी – ५० फुट व पूर्व-पश्चीम रुंदी – ३० फुट असे एकूण दोन्ही प्लॉटची चतुसिमा –

पूर्वेस      –    २० फुट रुंदीचा रस्ता

पश्चिमेस   –    प्लॉट क्रं. १६

दक्षिणेस    –    २० फुट रुंदीचा रस्ता

उत्तरेस         –    खाजगी प्लॉट क्रं. १३ व १४

असे आहे. या चतुसिमे मधील खाजगी प्लॉट क्रं. १७ च्या एकूण २००० चौ. फुट पैकी १००० चौ. फुट. क्षेत्रफळ व  खाजगी प्लॉट क्रं. १८ चे संपूर्ण १५०० चौ. फुट. क्षेत्रफळ असे एकूण २५०० चौ. फुट. क्षेत्रफळ ज्याची चतु:सीमा खालील प्रमाणे आहे.

पूर्वेस      –    २० फुट रुंदीचा रस्ता

पश्चिमेस   –    प्लॉट क्रं. १७ मधील उर्वरित क्षेत्र

दक्षिणेस    –    २० फुट रुंदीचा रस्ता

उत्तरेस         –    खाजगी प्लॉट क्रं. १३ व १४

वरील चतुसिमेमधील मिळकत घेण्या बाबतचा ठराव माझ्या पक्षकाराने मिळकतीचे मालक शेख चांदपाशा अब्दुल खय्युम रा. मिस्कीनपुरा यांच्या सोबत केला असून तसे ठराव पत्र त्यांनी माझ्या पक्षकाराच्या हक्कात दि. ०८/०२/२०२१ रोजी करून दिले आहे व अग्रिम रक्कम स्वीकारलेली आहे.

वरील नमूद मिळकतीचे ठरावपत्र या पूर्वी सदर शेख चांदपाशा यांनी दि. ०५/१२/२०२० रोजी राजू बाबार मिर्झा बेग रा. कळंब यांच्या हक्कात नोंदविले होते. परंतु सदर बेग यांनी असमर्थता दर्शविल्याने ते ठरावपत्र रद्द केल्या बाबतचा करारनामा त्यांनी शेख चांदपाशा यांच्या हक्कात दि. ०८/०२/२०२१ रोजी करून दिलेला आहे. ठरावपत्र नुसार पुढील खरेदीखत नोंदणीचा व्यवहार दि. ०२/०३/२०२१ रोजी करण्याचे ठरले आहे.

सदरील प्लॉट हा निर्वेध व निर्जोखीम असल्याची हमी विद्यमान मालकाने माझ्या पक्षकारास दिलेली आहे. तरी सदर प्लॉट बाबत जर कोणाचा उजर, हक्क संबंध, कर्ज बोझा, गहाणखत, बक्षीसपत्र, कोर्ट डिक्री, मृत्यू पत्र, तारण, लीज, लीन, शेजाऱ्याचा वाद, शासकीय अथवा निम शासकीय कर्ज असेल तर त्यांनी सदरचे प्रगटन प्रसिद्ध झाल्या पासून १५ दिवसांच्या आत माझ्या खालील दिलेल्या कार्यालयीन पत्यावर लेखी उजर / आक्षेप दाखल करून रीतसर पोहोच पावती घ्यावी. मुदतीत जर कोणाचा आक्षेप न आल्यास सदरील प्लॉट हा पूर्णतः निर्विवाद व निर्जोखमी आहे, असे समजून माझे पक्षकार सदर प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत आपल्या हक्कात करून घेतील. याची नोंद घ्यावी.

सबब हे जाहीर प्रगटन.

जाहीर प्रगटन देणार

१. प्रकाश दगडू कांबळे,

२, रामदास दगडू कांबळे

तर्फे,

अँड. एस. व्ही. देशपांडे.

५४९/२, चित्रकुट,                

सिग्नल कॅम्प, लातूर

मो. क्रं. ९४२१३ ८०४८२

      सदरील जाहीर प्रगटन हे www.epragatan.com या संकेतस्थळावर लाईव्ह आहे. सदरील जाहीर प्रगटन हे १. प्रकाश दगडू कांबळे, २, रामदास दगडू कांबळे यांनी पुरवलेल्या माहिती व दाखवलेल्या कागदपत्रा  आधारे प्रकाशित केले आहे, आणि ते कायम स्वरूपी लाईव्ह असेल. त्यामध्ये कधीही फेरबदल केला जाऊ शकत नाही.

दि. ०९/०२/२०२१   

प्रोप्रा.

सत्याई एन्टरप्राईजेस,

लातूर.

         

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *