विनय मिरकले वकील

लातूर जिल्हा व परिसरातील विशेषतः मौजे सेलू तालुका औसा जिल्हा लातूर हद्दीतील तमाम जनतेस या जाहीर प्रगटन द्वारे सूचित करण्यात येते की माझे पक्षकार देवासला हणमंत चामे यांनी मला दिलेल्या माहितीवरून व दाखवलेल्या कागदपत्रा वरून तसेच मला वकील म्हणून अधिकृत केले वरून सर्व जनतेच्या माहितीस्तव पुढीलप्रमाणे जाहीर प्रगटन देत आहे.

माझे पक्षकार यांनी व्यंकट प्रल्हाद चामे, यांच्या मालकी कब्जे वाहिवातीतील मौजे सेलू तालुका औसा जिल्हा लातूर येथील जमीन गट क्रमांक ५२८ क्षेत्र ० हेक्टर ४० आर ज्याचा आकार ० रुपये ३२ पैसे असा आहे. वरील वर्णनीय जमीन ही विक्री क्षेत्र असून या जानिनीच्या चातुसिमा खालील प्रमाणे आहेत.

पूर्वेस : व्यंकट चामे यांची याच गटातील शिल्लक जमीन
पश्चिमेस : दैवाशाला हनमंत चामे यांची जमीन
दक्षिणेस : दत्तात्रय चामे व मोहन चामे यांची जमीन
उत्तरेस : कोळी यांची जमीन.

येणे प्रमाने वरील चातुसिमे तील ० हेक्टर ४० आर जनीन विद्यमान मालक व्यंकट प्रल्हाद चामे यांनी माझ्या पक्षाकारस कायमस्वरूपी विक्रीचा करार साक्षीदारा समक्ष करून दिलेला आहे. ठरावा पोटी काही रक्कम विद्यमान मालकान स्वीकारली आहे. राहिलेली रक्कम खरेकीखता चे वेळी देण्याचे ठरले आहे. तसेच सदरील जनीन निर्वेध असल्याची हमी विद्यमान मालकाने माझ्या पक्षकारास दिलेली आहे. तरी सदर जमिनीवर कोणाचा उजर, हक्क समंध कर्जे बोजा गहाणखत बक्षीस पत्र न्यायालयीन हुकुन्नामा मृत्युपत्र तारण लीज लीन शेजारी वाद शासकीय निमशासकीय कर्जे असेल त्यांनी सदरचे प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसात माझ्या खालील पत्ता वर उजर आक्षेप दाखल करून रीतसर पोहोच घ्यावी. मुदतीत जर कोणाचा आक्षेप न आल्यास सदरील जनीन ही पूर्णता निर्विवाद व निर्जोखीम आहे, असे समजून माझे पक्षकार सदरील व्यवहार नोंदणीकृत खरेदी पत्रान्वये पूर्ण करतील याची नोंद घ्यावी.

सबब हे जाहीर प्रगटन आज दि २३/०८/२०१७ रोजी प्रसिद्ध केले.


One thought on “विनय मिरकले वकील”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *