अँड. एम. एस. महिंद्रकर

जाहीर प्रगटन

लातूर जिल्हा व परिसरातील विशेषतः मौजे कन्हेरी ता. जि. लातूर (महानगरपालिका हद्दीतील) येथील तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार  शिवाजी हनुमंतराव मोमले, रा मेघराज नगर लातूर, मो. नं. – 9404379285 यांनी मला दिलेल्या माहितीवरून व दाखविलेल्या कागदपत्रांवरून तसेच मला वकील म्हणून अधिकृत केल्यावरून सर्व जनतेच्या माहितीस्तव पुढील प्रमाणे जाहीर प्रगटन देत आहे.

सर्व जनतेस कळविण्यात येते की लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मौजे कन्हेरी येथील सर्वे नंबर 29 मधील प्लॉट क्र. 4 याचा मनपा मिळकत क्र. बी-7/1388 चा  विद्यमान मालक उमाकांत केसगिरे मालक व कब्जेदार होता. कराराप्रमाणे माझे पक्षकार यांनी उमाकांत केसगिरे यांना प्लॉट विक्री किमती पैकी काही रक्कम ईसार म्हणून धनादेशाद्वारे दिलेली आहे. मी इसार रक्कम रुपये 3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लाख फक्त) सोलापूर जनता सहकारी बँक शाखा गंजगोलाई लातूर चा धनादेश क्रमांक 076580 अन्वये दिलेले आहेत आणि उमाकांत केसगिरे यांनी ते स्वीकारलेले आहेत.

2]      उमाकांत केसगिरे यांनी माझ्या पक्षकारा सोबत प्लॉट विक्रीचा करार केलेला असताना त्याबाबत इसार रक्कम स्वीकारलेली असतानाही मुदतीमध्ये प्लॉट विक्री करणे या ना त्या कारणाने टाळले असल्यामुळे माझ्या पक्षकाराने त्यांना वकील मार्फत प्लॉट खरेदी विक्री करण्याबाबत नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळूनही उमाकांत केसगिरे यांनी माझ्या पक्षकाला वरील वर्णनीय प्लॉट विक्री केलेला नाही. माझ्या पक्षकाराने पाठवलेल्या नोटीसच्या उत्तरात उमाकांत केसगिरे यांनी कसलेही समर्पक कारण प्लॉट विक्री न करण्याकरिता दिलेले नाही आणि माझ्या पक्षकाराची फसवणूक करण्याकरिता त्यानी सदरील प्लॉट हा त्यांच्या पत्नी वर्षा उमाकांत केसगिरे यांना नोंदणीकृत दस्ता अन्वये बक्षीस दिलेला आहे, सदरील बक्षीसपत्र हे मी पाठविलेली नोटीस मिळताच त्यांनी केलेले आहे आणि महत्वाची बाब म्हणजे नोटीस च्या उत्तरामध्ये त्यानी बक्षीसपत्राची बाब कपटीपनाने लपवून ठेवलेली आहे. माझ्या पक्षकाराने उमाकांत केसगिरे यांच्या विरुद्ध दिवाणी न्यायालय लातूर येथे विशेष दिवाणी दावा क्रमांक 270/2022 दाखल केलेला आहे, तसेच उमाकांत केसगिरे व वर्षा केसगिरे यांनी माझ्या पक्षकाराची फसवणूक केल्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, लातूर यांना विनंती अर्ज देऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केलेली आहे. तरी तमाम जनतेने वरील वर्णनीय प्लॉट बाबत उमाकांत केसगिरे किंवा वर्षा केसगिरे यांच्या सोबत खरेदी, विक्री, तारण बाबत कसलाही व्यवहार करू नये, व्यवहार केल्यास याची जबाबदारी व जोखीम आपल्यावर राहील सबब हे जाहीर प्रगटन.

सदरील जाहीर प्रगटन हे www.epragatan.com या संकेतस्थळावर लाईव्ह आहे. सदरील जाहीर प्रगटन हे शिवाजी हनुमंतराव मोमले, रा मेघराज नगर लातूर यांनी पुरवलेल्या माहिती व दाखवलेल्या कागदपत्रा  आधारे प्रकाशित केले आहे, आणि ते कायम स्वरूपी लाईव्ह असेल. त्यामध्ये कधीही फेरबदल केला जाऊ शकत नाही.

सबब हे जाहीर प्रगटन.

दिनांक– 31/10/2022

तर्फे,

अँड. एम. एस. महिंद्रकर

आबासाहेब संकुल, मित्र नगर, लातूर

मो. क्र. – 9823049260.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *