ज्ञानोबा नारायण सावंत

जाहीर प्रगटन

(मौजे पाखरसांगवी ता. जि. लातूर येथील जमीन गट क्र. ७८ पैकी प्लॉट क्र. १८३ पुर्ण, ज्याचे क्षेत्रफळ १५०० चौ. फुट जो सौ. दिपा जगदीपराव कुलकर्णी यांचे मालकीचा लातूर, तसेच विशेषतः मौजे पाखरसांगवी ता. जि. लातूर येथील सर्व जनतेस या प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार श्री. ज्ञानोबा नारायण सावंत, रा. भाग्यनगर, अहमदपूर यांनी अधिकृत केले वरुन व सर्व कागदपत्राआधारे खालीलप्रमाणे जाहीर प्रगटन देण्यात येत आहे.

हे की, सौ. दिपा जयदीपराव कुलकर्णी रा. आपलेश्वर नगर, लातूर यांचे मालकीची व कब्जेवहिवाटीचा प्लॉट जो त्यांनी नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. ४२७७/२००३ दि. ०४/०८/२००३ अन्वये गुरुनाथ कृष्णा बिराजदार यांचेकडून खरेदी घेतलेला, जो नोंदणी तुकडी लातूर, पोट तुकडी लातूर, तालुका लातूर, ग्रामपंचायत पाखरसांगवी ता.जि. लातूर हद्दीतील मौजे पाखरसांगवी ता. जि. लातूर येथील जमीन गट क्र. ७८ पैकीचा प्लॉट क्र. १८३ पुर्ण, ज्याचा ग्रामपंचायत क्र ४७६१ आहे, ज्याची लांबी पुर्व-पश्चिम दोन्ही बाजू ५० फुट व रूंदी दक्षिण-उत्तर दोन्ही बाजू ३० फुट आहे, ज्याचे एकुण क्षेत्रफळ १५०० चौ. फुट आहे. सदरील प्लॉटच्या चतुःसिमा, खालीलप्रमाणे. पुर्वेस :- २० फुट रूंदीचा रस्ता,
पश्चिमेस :- प्लॉट क्र १७६,
दक्षिणेस :- नवीन झालेला रस्ता,
उत्तरेस :- प्लॉट क्र १८२.

येणे प्रमाणे वरील चतुःसीमेच्या आतील प्लॉट बाबत माझे पक्षकाराने प्लॉटच्या मालक सोबत लेखी करारनामा केलेला असून, त्यांनी उपरोक्त प्लॉट हा निर्विवाद आहे असे सांगितले व लिहून दिलेले आहे. तसेच सदरच्या करारापोटी माझे पक्षकाराने प्लॉट मालकांना इसार रक्कम ही दिलेली आहे. तरी वरील प्लॉटसंबंधी जर कोणाचे काही हक्क, कर्ज बोजा, बँक गहाणखत, लिज, दान, जामीन, कोर्ट डिक्री आधारे बोजा, पोटगी, वारसा हक्क संबंध, करार, | हस्तक्षेप, हक्क, कुळ संबंध अथवा सदरील ठरावाबाबत कोणाचा कसला उजर, चतुःसीमेबाबत वाद इतर कसलेही अधिकार असे तर त्यांनी हे जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसाच्या आत, योग्य त्या कागदपत्रांसह, लेखी पुराव्यासह खालील पत्त्यावर लेखी उजर / आक्षेप दाखल करावा. कोणाचा काही आक्षेप किंवा उजर न आल्यास माझे पक्षकार सदर मिळकत ही निर्धोक निर्जोखीम असल्याचे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. !

सदरील जाहीर प्रगटन हे www.epragatan.com या संकेतस्थळावर लाईव्ह आहे. सदरील जाहीर प्रगटन हे ज्ञानोबा नारायण सावंत यांनी पुरवलेल्या माहिती व दाखवलेल्या कागदपत्रा आधारे प्रकाशित केले आहे, आणि ते कायम स्वरूपी लाईव्ह असेल. त्यामध्ये कधीही फेरबदल केला जाऊ शकत नाही.

सबब हे जाहीर प्रगटन. दिनांक : 18/03/2022.

तर्फे

अॅड. संदीप सुधाकरराव औसेकर “समृध्दी’ ‘वाल्मिकी नगर, लातूर-

मो. ९८२२५३८४०८

जाहिर प्रगटन देणार श्री. ज्ञानोबा नारायण सावंत,

रा. भाग्य नगर, अहमदपूर

मो. ९०४९९२४१५५

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *