अँड . मंगेश महिंद्रकर

जाहीर प्रगटन
माझे पक्षकार रमेश व्यंकटराव मंचलु व संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून व दाखवलेल्या कागदपत्रावरून तमाम जनतेस सदरील जाहीर प्रगटनापासून सूचित करण्यात येते की, रमेश व्यंकटराव मंचलु व इलीयास अहमद खान मकसूद अली खान आणि हरीप्रसाद मंगलदास ठाकरे यांनी मौजे लातूर जमीन सर्वे नंबर २३४/३ मध्ये जमीन क्षेत्र ०३ एकर संयुक्तपणे विकत घेतली होती. या संयुक्त मालकांनी सदरील जमिनीचा अकृषी वापर परवानगी घेऊन खाजगी लेआउट प्रमाणे सर्व प्लॉट ले आउट प्रमाणे चतु:सीमा नमूद करून विकलेले आहेत. खाजगी लेआउट प्रमाणेच महानगरपालिकेने परिसरामध्ये विकास कामे केलेली आहेत. लेआउट प्रमाणेच महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा केलेला आहे.

या संयुक्त मालकांचे नाव ७/१२ उताऱ्यावर कमी केलेले नाही. मौजे लातूर जमीन सर्वे नंबर २३४/३ मध्ये असलेले संयुक्त मालकीचे नावाचा गैरफायदा घेऊन हरिप्रसाद मंगलदास ठाकरे व जीवन हरिप्रसाद ठाकरे यांनी, प्रलोभनांना बळी पडून खाजगी लेआउट मध्ये दर्शवलेल्या रस्त्यांची बेकायदा विक्री केलेली आहे, त्या बाबत त्याच्यावर फौजदारी व दिवाणी कार्यवाही न्यायालयात प्रलंबित आहेत. 
रमेश व्यंकटराव मंचलु, इलीयास अहमद खान मकसूद अली खान यांनी नियमित दिवाणी दावा क्रमांक ०६/२०१६ हरिप्रसाद मंगलदास ठाकरे व जीवन हरिप्रसाद ठाकरे यांच्या विरुद्ध ते मौजे लातूर जमीन सर्वे नंबर २३४/३ मध्ये कसल्याही प्लॉट, घर, जागेचे मालक कब्जेदार नाहीत असे घोषित करण्याकरिता दाखल केलेला होता. मे. दिवाणी न्यायालय लातूर यांनी हरिप्रसाद मंगलदास ठाकरे व जीवन हरीप्रसाद ठाकरे हे मौजे लातूर जमीन सर्वे नंबर २३४/३ मधील कसल्याही क्षेत्राचे मालक व कब्जेदार नाहीत असा हुकूमनामा पारित केलेला आहे.
आमचे पक्षकारांना जीवन हरिप्रसाद ठाकरे हे पुन्हा मौजे लातूर जमीन सर्वे नंबर २३४/३ मधील हरिप्रसाद मंगलदास ठाकरे यांचे संयुक्त मालकी मध्ये असलेल्या नावाचा गैरफायदा घेऊन पुन्हा रस्ते विक्री करण्याचा बेकायदा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळालेली आहे, तरी या जाहीर प्रगटना आधारे आमचे पक्षकार तमाम जनतेस सूचित करू इच्छितात की,  मौजे लातूर जमीन सर्वे नंबर २३४/३ मध्ये कोणीही जीवन हरीप्रसाद ठाकरे याचे सोबत प्लॉट, घर, जागा संबंधी खरेदीचा व्यवहार करू नये. जीवन हरीप्रसाद ठाकरे याला मौजे २३४/३ मध्ये कसल्याही घराची, प्लॉटची, जागेची मालकी नाही.  तसा हुकूमनामा मे. दिवाणी न्यायालय लातूर यांनी पारित केलेला आहे. सबब हे जाहीर प्रगटन.

अँड. मंगेश महिंद्रकर
“आबासाहेब संकुल” मित्र नगर,
टिळक नगर पोस्ट ऑफिस जवळ, लातूर.
भ्र. ध्व. ९८९०४४९२६० ९८२३०४९२६०

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *