महादेव विरभद्रप्पा विजापूरे

जाहीर प्रगटण लातूर जिल्हा व परिसरातील विशेषतः  मौजे पेठ ता. जि. लातूर  येथील जनतेस या जाहिर प्रगटनाद्वारे सुचित करण्यात येते की, माझे पक्षकार , महादेव  विरभद्रप्पा विजापूरे रा लातूर ता. जि. लातूर..यांनी मला दिलेल्या माहितीवरुन व दाखविलेल्या कागदपत्रावरुन तसेच मला वकील म्हणुन अधिकृत केले वरुन सर्व जनतेच्या माहितीस्तव खालील प्रमाणे जाहीर प्रगटन देत आहे. माझे पक्षकार  यांनी श्री रविंद्र शिवलिंगप्पा महाजन,रा. पुस ता. अंबाजोगाई, जि. बिड.  रा लातूर ता. जि. लातूर यांच्या   कब्जे वहिवाटीतील नोंदणी तुकडी लातूर, पोट तुकडी लातूर तालूका लातूर, जिल्हा व जिल्हा परिषद लातूर, तालुका पंचायत समिती लातूर पैकी मौजे पेठ ता. जि. लातूर येथील जमीन गट नं. ४५ मधील प्लॉट क्र. ०८  पूर्ण , ज्याची  लांबी ११ मी व रूंदी  १४. ४४ मी  . ज्याचे एकुण क्षेत्रफळ १५८.८४ चौ.मी.असुन सदर प्लॉट चे  मुळमालक विनोद गोरोबा वाघमोडे  यांनी सदर प्लॉट श्री रविंद्र शिवलिंगप्पा महाजन यांना विक्री चा ठराव  करून  दिलेला आहे सदर विक्री च्या ठराव पत्रा आधारे  प्लॉट विक्री चे ठरावपत्र  माझे पक्षकाराच्या हक्कात करून  दिले आहे ज्याच्या  चतु:सिमा खालीलप्रमाणे :पुर्वेस-९मी. रुंदीचा रस्तापश्चिमेस-महालिंगप्पा धरणे  यांची  जमीन.दक्षिणेस-प्लॉट नं. 7उत्तरेस-प्लॉट नं. ९ येणे प्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील प्लॉट ,  श्री रविंद्र शिवलिंगप्पा महाजन, यांनी माझे पक्षकारास सदर   प्लॉट कायमस्वरुपी विक्रीचा  ठराव साक्षीदारासमक्ष करुन देऊन इसारापोटी कांही रक्कम माझे पक्षकाराकडुन स्विकारली आहे व उर्वरीत रक्कम खरेदी खताच्या वेळी देण्याचे ठरले आहे. तसेच सदर प्लॉट  निर्विवाद व निर्जोखीम असल्याची हमी माझे पक्षकारास दिलेली आहे. तरी सदर प्लॉट  बाबत जर कोणाचा उजर, आक्षेप, हीतसंबंध हक्कसंबध, कर्जबोजा, गहाणखत, बक्षीसपत्र, कोर्ट डिक्री, मृत्युपत्र, तारण, लीज, शेजाऱ्याचा वाद शासकीय अथवा निमशासकीय कर्जबोझा, न्यायालयीन वाद असतील तर त्यांनी सदरचे प्रगटन प्रसिद्ध झालेपासुन सात (7) दिवसाचे आत माझे खालील दिलेल्या कार्यालयीन पत्यावर योग्य त्या कागदपत्रांसह लेखी उजर / आक्षेप दाखल करावा व त्याची रितसर पोहंच घ्यावी. मुदतीमध्ये जर कोणाचा उजर / आक्षेप नाही आल्यास सदर प्लॉट निर्विवाद व निर्जोखीम आहे असे गृहित धरुन माझे पक्षकार सदर प्लॉट चे नोंदणीकृत खरेदीखत मुळ मालकाकडून आपल्या हक्कात करुन घेतील व त्यांनतर येणारे उजर / आक्षेप माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत याची सर्व जनतेने नोंद .सबब हे जाहीर प्रगटन.दिनांक :७/२/2023तर्फेअँड. एम. एस. महिंद्रकर आबा साहेब संकुल, मित्र नगर  लातूर ता. जि. लातूर  मो.9890449260जाहीर प्रगटन देणार – महादेव  विरभद्रप्पा विजापूरे रा. नंदी स्टॉप लातूर ता. जि. लातूर.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *